गुमगावची जिल्हा परिषद शाळा होणार 'आदर्श'; राज्यातील ३०० शाळांमध्ये समावेश| Sakal Media |

2021-04-28 3

गुमगाव (जि. नागपूर): राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.यामध्ये एका तालुक्यातून एक याप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १३ शाळांचा समावेश आहे.यामध्ये हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,क्रमांक २ ची निवड झाल्याने शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांवर गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पहिली ते चौथीचे एकूण १५९ विद्यार्थी असलेल्या हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आधीच १०० टक्के प्रगत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना ड्रेसकोड आणि ओळखपत्र, इंग्रजीतून परिपाठ,माझे सामान्यज्ञान,जी तारीख तो पाढा, प्रश्नमंजुषा,श्रुतलेखन, इंग्रजी संभाषण, इंग्रजीमध्ये मुलाखत, स्वतःची इंग्रजीमध्ये ओळख करून देण्यासारखे अनोखे उपक्रम राबविण्यात येत असल्याने ग्रामस्थही प्रभावित झालेले आहेत.आदर्श शाळेमध्ये निवड करण्यात आल्याने गावकऱ्यांनी माजी केंद्रप्रमुख महेंद्र पारसे,मुख्याध्यापक अनिल तुरारे, शिक्षिका अमृता तिवारी,शारदा खळतकर, आशा मेश्राम,प्रीती खंगार, आहुती रोडगे,स्वाती झाडे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
(व्हिडीओ: रविंद्र कुंभारे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires